
फोटो गॅलरी






श्री संताजी महाराजांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व कॅलेंडर प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा
नाशिक येथील अग्रगण्य आणि नामांकित श्री संताजी महाराज नागरी पतसंस्थेत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष श्री गजानन नाना शेलार यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सन २०२६ ची दिनदर्शिका प्रकाशीत करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष श्री अविनाश पवार, उपाध्यक्ष सौ. अंजली आमले, चिटणीस डॉ. भूषण कर्डिले, खजिनदार श्री नितीन महाले, जनसंपर्क संचालिका सौ. उषाताई शेलार, डॉ. शरद महाले, तसेच संस्थेचे संचालक श्री अशोक कस्तुरे, श्री यशवंत चौधरी, श्री राजेंद्र गवळी, तज्ञ संचालक श्री अशोक करपे आणि श्री ज्ञानेश्वर रोकडे, सल्लागार सदस्य श्री पांडुरंग सोनवणे व सौ. सोनाली चौथे पाटील यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. समाजबांधव, अल्पबचत प्रतिनिधी आणि कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था व मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव बक्षीस समारंभ २०२५
श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व श्री संताजी मंडळ, नाशिक यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस समारंभ तसेच समाजातील दानशूर व्यक्ती श्री. वैरागी, श्री. सावरे व श्री. पंडित यांचा सत्कार कार्यक्रम पतसंस्थेचे चेअरमन श्री. अविनाश प्रभाकर पवार यांच्या हस्ते रोटरी क्लब येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्री. गजानन शेलार, डॉ. भूषण कर्डिले, डॉ. शरद महाले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत सन २०२५-२६ कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
श्री. संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक चे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अध्यक्षपदी श्री.अविनाश प्रभाकर पवार तर उपाध्यक्षपदी सौ.अंजली विजय आमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहकार अधिकारी श्री. शैलेश पोतदार साहेब व पतसंस्थेचे संचालक श्री. डॉ. शरद महाले, श्री.अशोक कस्तुरे, श्री.नितीन महाले, सौ.उषाताई शेलार, सौ.मंदाकिनी क्षीरसागर व व्यवस्थापक श्री. रवींद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
वार्षिक सर्वसाधारण सभा २७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आली
श्री. संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली
श्री. संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक वेडूशेठ कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी संचालक मंडळाच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले आणि श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. आर्थिक वर्षात संस्थेच्या झालेल्या प्रगतीचा आढावा घेताना सन २०२४–२०२५ या वर्षात संस्थेला ३१ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, संस्थेच्या सभासदांना १२% लाभांश वितरित करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापक श्री. रविंद्र पगार यांनी सभेचे इतिवृत्त व अहवाल वाचून दाखवले आणि सभासदांनी सर्व ठराव एकमताने मंजूर केले. या प्रसंगी आरोग्यविषयक जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. महेश करंदीकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. उषा शेलार, सचिव डॉ. शरद महाले, डॉ. भूषण कर्डिले, श्री.अविनाश पवार, श्री.नितीन महाले, श्री.राजेंद्र गवळी, सौ.अंजली आमले, सौ.मंदाकिनी क्षीरसागर, श्री.अशोक कर्पे आणि श्री.मोहनलाल चौधरी यांची उपस्थिती होती. सभासद, कर्मचारी वृंद आणि अल्पबचत प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेला महाबळेश्वर येथे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
श्री संताजी महाराज पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन
श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजन व २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मार्गदर्शक गजानन शेलार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष अशोकशेठ कस्तुरे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करताना संस्थेच्या एकूण ठेवी ३७ कोटी ४१ लाख असून, कर्जवाटप २८ कोटी १४ लाख, तर भाग भांडवल एक कोटी ४२ लाख रुपये आहे, असे सांगितले.
श्री संताजी महाराज पतसंस्थेत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात
नाशिक येथील अग्रगण्य आणि नामांकित श्री संताजी महाराज नागरी पतसंस्थेत श्री संताजी महाराज जगनाडे यांची ४००वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस व धर्मदाय सहआयुक्त विवेक सोनुने, गजानन शेलार, अशोक कस्तुरे, डॉ. भूषण कर्डिले यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पतसंस्थेचे संचालक अविनाश पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. या प्रसंगी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा उषा शेलार, चिटणीस डॉ. शरद महाले, यशवंत चौधरी, नितीन महाले, अंजली आमले, मंदाकिनी क्षीरसागर, राजेंद्र गवळी, अशोक कर्पे, ज्ञानेश्वर रोकडे, अमर किर्वे, मोहनलाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी गुणगौरव समारंभ
श्री. संताजी महाराज पतसंस्था व संताजी मंडळ नाशिक यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न.
नाशिक येथील श्री. संताजी महाराज पतसंस्था व संताजी मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २५/०८/२०२४ रोजी विद्यार्थी गुणगौरव समारंभ रोटरी क्लब गंजमाळ नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. सदर विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास धर्मदाय सहआयुक्त श्री. विवेक सोनुने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी श्री. गजानन नाना शेलार श्री. अशोक वेडूशेठ कस्तुरे श्री. डॉ.भूषण वसंतराव कर्डिले श्री. मोहनलाल चौधरी श्री. अशोक काका व्यवहारे श्री. रमेश मामा वनकर आदी मान्यवर व विद्यार्थी पालक उपस्थित होते.